Panjabrao Deshmukh information in marathi
पूर्ण नाव | पंजाबराव शामराव देशमुख |
---|---|
जन्म | 27 डिसेंबर 1898 |
मुळ आडनाव | कदम |
जन्मगाव | पापळ (अमरावती जिल्हयात) |
वडीलाचे नाव | शामराव |
आईचे नाव | राधाबाई |
मृत्यू | 10 एप्रिल 1965 (दिल्ली ) |
पंजाबराव देशमुख यांचा जीवनप्रवास
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी झाला. डॉ. देशमुख यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती.त्यांनी इंग्लंड मध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले.आणि अमरावती येथे वकिली केली.' भूतकाळ विसरा , तलवार विसरा , जातीभेद पुरा व सेवाभाव धरा. ' असे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी म्हटले आहे.इ.स 18 ऑगस्ट 1928 रोजी अमरावतीचे अंबाबाई मंदिर अस्पृश्यांना खुले करावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह केला. व ते यशस्वी झाले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी महत्वाचे प्रश्न :
* भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
डॉ. पंजाबराव देशमुख.
* डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले ?
ई.स. 1927 मध्ये त्यांनी 'शेतकरी संघाची ' स्थापना केली. व या संघटनेच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी ' हे वर्तमानपत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सुरू केले.
* डॉ. पंजाबराव देशमुख यांचे लग्न केव्हा झाले ?
इ.स. 1924 सुवर्ण समाजातील कु. विमल वैद्य, मुंबई या सुविद्य युवतीशी प्रार्थना समाजाच्या पद्धतीने त्यांचा आंतरजातीय विवाह झाला.
* अमरावती येथे श्रद्धांनंद छात्रालय कोणी सुरू केले ?
अमरावती येथे श्रद्धांनंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख सुरू केले.
* ' माती, मान्सून , माणुसकी ही शेतकर्याची धनदौलत आहे. ' असे कोणी म्हटले ?
डॉ. पंजाबराव देशमुख
* डॉ. पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्तानच्या कृषक क्रांतिचे जनक म्हणतात .
* श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ' श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ' 1932 मध्ये स्थापना केली .
* 1952 मध्ये अमरावती येथे कस्तुरबा कन्या शाळेचे निर्माण डॉ. पंजाबराव देशमुख यांनी केले.
* 10 एप्रिल 1965 मध्ये दिल्ली येथे डॉ.पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू झाला.
0 Comments